• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कराड प्रांत कार्यालयातील दोघे कंत्राटी लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मे 19, 2023
in सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | सातारा |
भूसंपादनावेळी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येरवळे (ता. कराड) गावातील सुमारे नऊ शेतकर्‍यांकडून २० हजारांची लाच घेताना कराडच्या प्रांत कार्यालयातील दोघे कंत्राटी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. रामचंद्र श्रीरंग पाटील व दिनकर रामचंद्र ठोंबरे अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी येरवळे (ता. कराड) गावच्या नऊ शेतकर्‍यांकडून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करताना विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे. त्याप्रमाणे तक्रारदार हे कराड कार्यालयातील उपविभागीय अधिकारी येथे मूल्यांकन प्रक्रियेबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी दोन्ही कंत्राटी लिपिक यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर लाच रक्कम स्वीकारताना दि. १९ रोजी आरोपी कंत्राटी लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदरील कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहा.पोलीस उपनिरीक्षक शंकर सावंत, पो.ना. निलेश राजपूरे, पो.शि. विक्रमसिंह कणसे यांनी केली.


Previous Post

सातार्‍यात २१ व २२ मे रोजी महारोजगार मेळावा

Next Post

प्रवचने – भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा

Next Post

प्रवचने - भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा

ताज्या बातम्या

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023

श्रीराम कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : श्रीमंत संजीवराजे

जून 8, 2023

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023
अग्निशामक केंद्रा समोर वृषरोपण करताना अधिकारी व पदाधिकारी

पर्यावरण दिनी बारामती एमआयडीसी मध्ये वृषरोपण

जून 8, 2023
वृक्षारोपण करताना रोहिणी खरसे आटोळे व इतर

वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी

जून 8, 2023
कटफळ येथे वृषरोपण करताना मान्यवर

कटफळ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी वृषरोपण

जून 8, 2023

प्रवचने – भगवंताचे अनुसंधान राखावे

जून 8, 2023

महावितरण चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

जून 8, 2023

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

जून 8, 2023

सातारच्या जिल्हाधिकारी पदी जितेंद्र दुडी; रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

जून 7, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!