स्थैर्य,तापोळा, दि १६ : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणारा तापोळा दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी बहरले असून शिवसागर जलाशयात बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे.
शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत पर्यटक व व्यावसायिकही कटिबध्द असल्याने हे सुरक्षित पर्यटन असल्याचे पर्यटकांनी सांगितले. तापोळा या ठिकाणी पर्यटकांनी सुट्ट्यामुळे गर्दी केली असून येथील बोटिंग व्यावसायिक, हॉटेल, खेळणी व्यावसायिक यामुळे आनंदित झाले आहेत. त्यामुळे आठ महिने बंद असणारे पर्यटन बंद आल्याने येथील व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. शासनाने सर्व अटींवर हे व्यवसाय सुरू केल्याने येथील पर्यटन स्थळावरील व्यवसायिक व ग्रामस्थ आनंदले आणि पर्यटकांच्या स्वागतासाठी आतुरले होते. त्यानुसार येथील व्यावसायिकही शासनाच्या नियमांचे पालन करून पर्यटकांना सेवा देत आहेत. त्यामुळे हा परिसर पर्यकांनी फुलून गेला आहे.