दुष्काळाची दाहकता वाढली; नवीन बोअरवेल आणि विहिरींच्या खोदकामावर तात्पुरती बंदी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि भूजल पातळी खालावल्यामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेत नवीन बोअरवेल व विहिरींच्या खोदकामावर तात्पुरती बंदी घातली आहे.

स्थैर्य, सातारा,, दि. १५ ऑक्टोबर : पावसाळ्यातील खंड आणि अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने हा कठोर पाऊल उचलला असून, नवीन बोअरवेल आणि विहिरींच्या बांधकामावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

खोदकामावर कडक प्रतिबंध

स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, ग्रामीण आणि शहरी भागात नवीन बोअरवेल किंवा विहिरी खोदण्यासोबतच जुन्या विहिरींचे खोलीकरण करण्यावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. भूजल साठ्याचे जतन करणे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील ताण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. व्यक्ती, शेतकरी, बिल्डर आणि कंत्राटदारांना हा नियम लागू असणार आहे.

सरकारी प्रकल्पांना सवलत

या निर्बंधांमधून शासकीय पाणी पुरवठा योजना आणि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाणीसाठ्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले असून नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!