महाराजा मल्टिस्टेटची आज वार्षिक सर्वसाधारण सभा


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । फलटण । महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या महाराजा मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडिट सोसायटी लि; फलटण या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवार, दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी मल्टीस्टेटचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. सदरची सभा दुपारी 4 वाजता येथील महाराजा मंगल कार्यालयात संपन्न होणार असून सभासदांनी कोवीड – 19 चे नियम पाळून सभेस ठिक वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.

महाराजा मल्टीस्टेटच्या दिनांक 31/03/2021 अखेर ठेवी 63,87,71,149.84 असून कर्ज वाटप 49,89,18,731.78 इतके केलेले आहे. सोसायटीस नफा 1,27,83,692.03 इतका झालेला आहे. सर्व सभासद, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतकांच्या सहकार्याने ही यशस्वी वाटचाल पुढे चालू असल्याचेही, रणजितसिंह भोसले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!