
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फलटण येथील जैन युवा फोरमच्या सर्व सभासदांनी साईबाबा मंदिरामध्ये महाप्रसादासाठी लागणारे साहित्य दान केले.
यावेळी जैन युवा फोरम फलटणचे अध्यक्ष तेजस शहा, माजी अध्यक्ष सिद्धेश शहा, संचालक ओंकार शहा-वाठारकर, जिनेंद्र शहा, मयूर शहा, क्षितिज घडीया यांनी उपस्थित राहून आपले योगदान दिले.
जैन युवा फोरमच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
