तब्बल आठ महिन्यांनंतर वाईतील महागणपती मंदिर खुले; भाविकांत समाधान


 

स्थैर्य, वाई, दि.१७: तब्बल आठ महिन्याच्या कालावधीनंतर आज वाईतील प्रसिद्ध महागणपती (ढोल्या गणपती) मंदिर शासनाच्या आदेशानुसार भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे भाविक व पर्यटकांची नेहमीप्रमाणे गणपतीच्या दर्शनासाठी वर्दळ सुरू होती. 

शासनाच्या नियमानुसार सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात येत होते. लहान मुलांना मंदिरात प्रवेश नसल्याने काहीजण बाहेरून दर्शन घेताना दिसत होते. मंदिर परिसरातील मोजकी दुकाने सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे दर्शनासाठी कधी खुली होणार या भाविकांच्या प्रश्नाला दीपावली पाडव्यादिवशी पूर्णविराम मिळाला. मंदिर समितीने केलेल्या नियोजनाप्रमाणे सकाळी भाविकांनी शिस्तीत मंदिरात प्रवेश केला. प्रवेशदारातच प्रत्येकाच्या हाती सॅनिटायझर देऊन थर्मोगणच्या साह्याने तपासणी केली जात होती. 

मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने परिसरातील दुकाने सुरू करण्यात आली. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचेच दिसत होते. दीपावली पाडवा असल्याने रस्त्यावर वाहतूक वाढली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!