सईबाई राणीसाहेब स्मृती स्थळास निधी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह यांनी मानले ना. फडणवीस यांचे आभार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | राजमाता श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब स्मृती स्थळास राज्य शासनाने रुपये २९ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मानले.

महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री यांची राजगड येथे दुर्लक्षित असणारी समाधीची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी समाधीच्या ऐतिहासिक जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी निधीची मागणी केली होती.


Back to top button
Don`t copy text!