घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर; व्यावसायिक दरांमध्ये मात्र वाढ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ टळल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, घरगुती गॅसचे दर जैसे थे आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ०५ नोव्हेंबर : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचे बजेट बिघडणार नाही.

व्यासायिकांसाठी मात्र दरवाढ

घरगुती गॅसचे दर स्थिर असले तरी, तेल कंपन्यांनी व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. १ नोव्हेंबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ लागू झाली आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक चालकांसाठी खर्च वाढणार असून, राज्यातील विविध शहरांमध्ये घरगुती गॅस ९४० ते १००० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!