‘निस्पृह आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला’; भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रदेश सचिव नागनाथ निडवदे यांना अर्पण केली श्रद्धांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. १७: भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे यांच्या निधनाने पक्षाने एक समर्पित, निस्पृह आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे, अशी श्रद्धांजली प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्पण केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रदेश सचिव नागनाथ निडवदे यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीसाठी समर्पित होते. ते संघाचे प्रचारक होते. भाजपामध्ये त्यांनी दीर्घकाळ संघटनात्मक कार्य केले. भाजपाचे लातूर जिल्ह्याचे सरचिटणीस व नंतर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सुमारे एक दशकापेक्षा अधिक काळ जबाबदारी पेलली. अत्यंत प्रतिकूल काळामध्ये जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी ते झटले. स्वच्छ चारित्र्याचा व समर्पण भावनेने काम करणारा निस्पृह कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या नम्र व संयमी स्वभावामुळे त्यांनी पक्षासाठी अनेक कार्यकर्ते जोडले. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी विकासकार्यात योगदान दिले होते. काही काळापूर्वी त्यांच्यावर पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. आपण त्यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.

Back to top button
Don`t copy text!