
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । फलटण । फलटणकरांचे आराध्य दैवत असलेले प्रभु श्रीराम मंदिर हे उद्या दि. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
प्रभू श्रीराम मंदिर व्यवस्थापनाने मकर संक्रातीदिवशी रामवसा घेण्यासाठी कोणीही महिला उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच फलटण शहरातील इतर मंदिरे व ग्रामीण भागातील मंदिर परिसरामध्ये जमावाने गर्दी करणेस प्रतिबंध करण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. यासोबतच कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
