दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण येथे ‘स्वीप’अंतर्गत मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्याकरिता ८ एप्रिल २०२४ रोजी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित सर्वांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी फलटण नगर परिषद, फलटण येथील मुख्याधिकारी निखिल मोरे सर, उपमुख्याधिकारी तेजस पाटील सर, कार्यालयीन नगरपालिका निरीक्षक जमदाडे सर, कृषी विभागाचे सचिन जाधव सर, बांधकाम विभाग कुंभार सर, नगर परिषद व्यवस्थापक शिरतोडे सर, व्यवस्थापक शिंदे सर, आत्मनिर्भर शहर स्तर संघ अध्यक्ष मालन गोडसे ताई, सीएमआरसी व्यवस्थापक शीला घाडगे मॅडम, उपजीविका सल्लागार मोनाली गावडे मॅडम, सयोगिनी सुप्रिया फडतरे मॅडम, विद्या रिठे मॅडम, नगर परिषद सीआरपी व बचत गटातील ९४ महिला उपस्थित होत्या.