
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ०७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
हनुमंतवाडी (ता. फलटण) येथे सोमवारी फलटण ग्रामीण पोलिसांनी बलेरो गाडीतून अवैधरित्या वाहतूक होणारी खाकी बॉक्समध्ये ठेवलेली २४ हजारांची दारू जप्त केली आहे. यावेळी पोलिसांनी बलोरो गाडीसह १३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी, सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी हनुमंतवाडी गावच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांनी दुपारी १२.३० वाजता छापा टाकून अवैधरित्या महिंद्रा कंपनीच्या बलोरो (क्रमांक एम एच ११ सी डब्ल्यू ७७०२) गाडीत वाहतूक होणारी बॉक्समध्ये ठेवलेली देशी दारू सुमारे २४ हजार रूपये किमतीची जप्त केली. यावेळी पोलिसांनी बलोरो गाडीसह एकूण १३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी नानासो रामचंद्र जाधव (रा. जाधववाडी तामखडा, तालुका फलटण) व शरद बाळासो चव्हाण (राहणार हनुमंतवाडी, तालुका फलटण) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करत आहेत.
