प्रांतपालांच्या भेटीने लायन्स क्लब परिवारात खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी: ला.भोजराज नाईक निंबाळकर; लायन्स क्लब फलटणच्या कार्याचे लायन्स प्रांतपाल रवींद्र देशपांडे यांचेकडून कौतुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

कार्यक्रमाप्रसंगी गोल्डन सर्व्हिसेस बुलेटिनचे प्रकाशन करताना रवींद्र देशपांडे. समवेत सौ.उज्वला निंबाळकर व लायन सदस्य.

स्थैर्य, फलटण दि.५: लायन्स क्लबचे प्रांतपाल रवींद्र देशपांडे यांनी नुकतीच फलटण येथे भेट दिली. सदर भेटी दरम्यान लायन्स क्लब फलटण, लायन्स क्लब फलटण गोल्डन व लायनेस क्लबच्या कार्याची पाहणी करुन त्या या कार्याचे कौतुक केले. यावेळी आयोजित संयुक्त बैठकीत बोलताना,  लायन्स संघटनेत प्रातपालांची अधिकृत भेट म्हणजे त्या क्लब्जची दिवाळी साजरी करणेसारखेच असल्याने फलटण क्लबला प्रथमच दिवाळी दरम्यानच प्रांतपाल एम.जे.पी.लायन रविंद्र देशपांडे यांनी अधिकृत भेट दिल्याने फलटणच्या सर्व लायन्स परिवारात खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी झाली, असे उद्गार लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी काढले.

यावेळी प्रांतपाल एम.जे.एफ. लायन रविंद्र देशपांडे यांनी आपले मार्गदर्शनाचे मनोगत व्यक्त करताना, लायन्स क्लब फलटणने त्यांचे हस्ते क्लबचे कार्यालयामध्ये कायमस्वरुपी डायबेटीक सेंटर सुरु केल्याबद्दल अध्यक्ष लायन बापू जगताप यांचे अभिनंदन केले. तसेच 4 महिने घेतलेल्या विविध सेवाकार्याबाबतसुद्धा त्यांचे कौतुक केले. लायन्स क्लब फलटण गोल्डनला सुरु करुन 7 महिनेच झाले असून लायन सौ.उज्वला निंबाळकर यांनी संस्थापक अध्यक्षाची धुरा अतिशय नियोजनबद्ध व सर्व सदस्यांचे सहकार्याने उत्तम सेवार्का केले. त्यामुळेच पहिल्या तीमाहित त्यांच्या क्लबचा सेवाकार्यात तिसरा क्रमांक 63 क्लबमध्ये व 30 हून कमी सदस्य संख्या असणार्‍या क्लब्जमध्ये प्रथम क्रमांक आल्याने प्रांतपालांनी सौ.उज्वला निंबाळकर यांचा पीन व प्रशस्तीपत्रक देून सत्कार केला व उत्तम रिपोर्टिंग केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 

सदर कार्यक्रमात सदर कार्यक्रमात तिन्ही क्लब्जचे सचिव ला.महेश साळुंखे, ला.निलम पाटील व लायनेस नेहा व्होरा यांनी अहवाल वाचन केले. लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या सेवाकार्यांना सहकार्य करणारे आर्ट ऑफ लिव्हींगचे डॉ.एम.ए.पोळ, डॉ.सौ.अलका पोळ व माजी पशुप्रांत डॉ.श्रीकांत मोहिते यांंचा यथोचित सत्कार प्रांतपालांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. 

यावेळी प्रांताचे सचिव लायन राजेंद्र वडगुळे, रिजन चेअरमन लायन बाळासोा भोंगळे, ला.रणजितभाऊ निंबाळकर, ला.मनुभाई पटेल, ला.मंगेश दोशी, रिजन सेक्रेटरी ला.तुषार गायकवाड, ला.राजीव नाईक निंबाळकर, ला.अर्जुन घाडगे, ला.सी.एस.कदम, ला.सुहास निकम, ला.रतनसिभाई पटेल, ला.नितीन गांधी, ला.बाळासो यादव, ला.विजय लोंढे – पाटील, ला.योगेश प्रभुणे, ला.विशाल शहा, ला.सुरेंद्र पवार, तसेच गोल्डन क्लबचे ला.सुनिल कदम, ला.सविता दोशी, ला.सुनंदा भोसले, ला.मंगल घाडगे, ला.नीलम देशमुख, ला.सीता जगताप, ला.डॉ.संजीवन राऊत, ला.धनश्री भोईटे व सर्व लायन्स व लायनेस सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. दोन्ही क्लब्जचे खजिनदार ला.विवेक गायकवाड व लायन मंगल घाडगे यांनी प्रांतपाल यांना डी.जी.फंड व एल.सी.आय.एफ. फंड सुपुर्द करुन दोन्ही क्लब्जचे अध्यक्षांनी प्रांतपाल व प्रांतीय सचिव यांना मोमेन्टो देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार लायन मृणाल प्रभुणे यांनी मानले व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगितानी करण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!