भरतगाववाडी येथे उदमांजरास जीवदान; वन विभागाच्या मोहिमेस ग्रामस्थांचे सहकार्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । सातारा । परिसरातील भरतगाववाडी (ता. सातारा) येथे वन विभाग अन् ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून सुमारे 40 फूट खोल विहिरीत अडकलेल्या उदमांजरास सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

भरतगाववाडी येथील अंकुश कणसे यांची गावालगत विहीर आहे. पाण्याच्या शोधार्थ आलेले उदमांजर या विहिरीत पडले. बराच वेळ प्रयत्न करूनही त्यास बाहेर पडता आले नाही. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्री. कणसे पाणी सोडण्यासाठी विहिरीकडे गेले असता त्यांना पाण्यात उदमांजर पाहावयास मिळाले. त्यानंतर त्यांनी याविषयीची माहिती वन विभागास कळविली.

वन विभागाचे वनपाल कुशल पावरा, वनरक्षक राज मोसलगी, चालक संतोष दळवी, सुमीत वाघ, शैलेश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. मग 40 फूट खोल असलेल्या विहिरीतून उदमांजरास जाळीच्या साहाय्याने यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. या उदमांजरास नंतर पाटेश्वर डोंगराकडे सोडून देण्यात आले. सुखदेव बर्गे, सुनील ढाणे, तुषार लोहार, अक्षय बर्गे, सुनील बर्गे आदी ग्रामस्थांनी याकामी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वन संरक्षक सुधीर सोनवले, वनपरीक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!