
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
कोळकी गावचे सुपुत्र प्रसाद नाळे यांची भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आज ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी कोळकीचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, माजी सरपंच कुंडलिक नाळे, माजी सरपंच सौ. स्वप्ना कोरडे, युवा नेते विक्रम पखाले, ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. अशोक नाळे, फलटण पंचायत समितीच्या दक्षता समितीचे सदस्य अजय कांबळे, राष्ट्रवादी कोळकी जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रुपेश नेरकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन रिटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
