दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । लातूर । आम्ही भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव महोत्सव साजरा करत आहोत हाच उत्साह साजरा करत असतांना आम्ही जे घडलो किंवा घडवले ते म्हणजे शिक्षक असा हा आज शिक्षक दिवस होय 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने जिवनात याला महत्त्व आहे.
आज देश प्रगतीच्या नकाशावर आहे आम्ही जगात अर्थंक्रांती मध्ये स्थान 5 वे सिद्ध केले हे भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आम्हाला स्वप्ने दाखवले त्या वाटेवर आम्ही पाऊल ठेवत आहोत ते शिक्षकांच्या विचाराने देशाचे भवितव्य हे शिक्षकामुळे आहे सर्वेच्च न्यायालयाचे न्यायधीश , राष्ट्रपती , पंतप्रधान , मुख्यमंत्री , डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभीयंता ,पत्रकार , वकील , लेखक ,कवी , प्रत्येक क्षेत्रात शिक्षकांच्या विचाराने आम्ही घडलोत आई – वडील यांच्या नंतर नवनवीन घडामोडी प्रत्येक क्षेत्रात शिकण्याची कला हि शिक्षक यांच्या कडून आम्ही शिकतो तो शिक्षक दिन आहे असो शिक्षण व शिक्षक म्हणून औसा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष लातूर जिल्हा कार्यध्यक्ष , जिल्हा निवडणूक समन्वयक समीती सदस्य डाँ.अफसर शेख यांचा संवेदशील सतर्कपणा पाहून स्वर्गीय शिक्षण महर्षी एन.बी.शेख साहेब यांनी शिक्षणात संघर्षीतुन हजारो शिक्षीत कुटंबीय यांच्या जिवनात सुखद जिवनमान ऊंचावले नौकरी च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले स्वतः शिक्षक शिरूर अनंतपाळ येथून नौकरीची सुरवात केली तसेच लातुर शहरात हि शिक्षक म्हणून नौकरी स्विकारली पण फक्त शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी धरपड केली संघर्ष केला शिक्षणाचे ज्ञान हे इतरांना हि अवगत व्हावे यासाठी शिक्षण संस्थेची उभारणी केली ती माजी आमदार बाळासाहेब जाधव यांच्या सहवासात राहून लातूर जिल्ह्यात व औसा शहरात शिक्षणाचा पाया रचला हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटी स्थापन केली ग्रामीण भागातील गरीबांच्या पाल्यांना शिक्षण दिले व त्याच बरोबर शिक्षीत तरुणांना नौकरी दिली कि युवा नवतरुण हा स्व:ताच्या पायावर उभा रहावा शिक्षक म्हणून वावरत असतांना अनेक संकल्पना अनेक संकट समस्या समोर उभ्या असतांना डगमगले नाही शिक्षणाचा प्रचार व प्रसार घराघरांत केला होतकरू , सामान्य , गोरगरीब यांच्या जिवनाला हातभर लावला विध्यार्थ्यांना वेळेप्रसंगी फिस मध्ये सवलत हि दिली. स्वर्गीय एन.बी.शेख साहेब भलेही संस्था चालक होते ; राष्ट्र व समाजाच्या प्रति हा समाजसेवक सतत सजग असायचा ! असो राजकीय जिवनात औरंगाबाद शिक्षक पदवीधर निवडणूक लढवली पण पराभव पत्कारावा लागला होता स्वर्गीय एन.बी.शेख साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे एकनिष्ठ विश्वासू , म्हणून परिचित होते राष्ट्रवादी काँग्रेस चे लातूर जिल्हध्यक्ष म्हणून कार्य केले जिल्ह्यात प्रत्येकाच्या मदतीला मदतीला धाऊन जायचे ! तो गुण हा शिक्षक म्हणून होता त्यांच्यातील मानवतेच्या विचार होता पक्ष व शिस्त व पक्षाचा विचार पुढे घेऊन चालणार्या पैकी स्वर्गीय एन.बी.शेख साहेब होते आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर हा दिवस म्हणून स्वर्गीय एन.बी.शेख साहेब यांच्या विचारांचा वारसा डॉ. अफसर शेख हे जपताना दिसून येत आहेत डॉ. अफसर शेख यांनी पाणी व कोरोना काळात औसा शहराची जी काळजी घेतली ती काळजी पाहून आणि त्यांचे संवेदनशील आहेत डॉ. अफसर शेख यांच्यात निश्रि्चतच स्वर्गीय एन.बी.शेख साहेब पहायला मिळताहेत आहेत. डॉ.अफसर शेख लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष म्हणून राजकारणी आहेत गोर गरीब नागरिकांची रोजगारा अभावी उपासमार होऊ नये , या साठी हा संवेदनशील समाज सेवक कोरोना काळात गरीबांना पीठ मीठ द्यायला पुढे आले खरेतर इथेच त्यांनी आपल्या स्वर्गीय एन.बी.शेख साहेब वडिलांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवले आहे.
राजकारण बारा महिने चोवीस तास असू नये , ते कांही काळ शोभा देते.एरव्ही पूर्ण समाजसेवा असावी , सच्चा राजकारण्याचे उत्तम लक्षण उदाहरण आहे डॉ. अफसर शेख यांच्यात असे कांही चांगले आणि कौतुकास्पद गुण पहायला मिळतात.सर्वात महत्त्वाचे हे की माणूस केवळ श्रीमंत असून उपयोगाचे नाही तर त्याच्या श्रीमंतीला दातृत्वाचे हात असावे लागतात , ते फार थोड्या लोकात असतात , त्यापैकी औशात स्वर्गीय एन.बी शेख होते आणि आज त्यांचे पुञ डाँ.अफसर शेख हे आहेत. औशात श्रीमंत मंडळी खूप आहेत.बोटावर मोजण्या इतके लोक सोडले तर कोणाचेही हात दातृत्वासाठी पुढे येत नाहीत आणि आलेही नाहीत. औसा सारख्या एखाद्या शहरात डॉ. अफसर शेख यांच्या सारखी चार पाच माणसं जरी असली तरी त्या शहरातल्या गरीबांना एक हक्काचा आधार मिळतो, डॉ.अफसर शेख यांच्यात स्वर्गीय एन.बी.शेख यांच्या विचारांचा वारसा शिक्षणाचा प्रचार व प्रसार सह राजकारणात अष्टपैलू दिसून येत आहे स्वर्गीय एन.बी.शेख यांनी शिक्षणाचा बाबतीत जो संघर्ष केला तोच वारसा पुढे पुत्र डॉ. अफसर शेख लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक समन्वयक समीती सदस्य व नातु श्री. सुलेमान अफसर शेख राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी प्रदेश सचिव तथा उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी जिल्हा निरक्षक हे पुढे वारसा जपत आहेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने…
सहशिक्षक –
श्रीमती नाजेमा अब्बास शेख
रूकय्या बेगम हायस्कूल लातूर
मो.नं 9423719957