वाजपेयींनंतर आदरणीय जयकुमार गोरेच भाजपात थोर नेते : श्रीमंत रामराजे


दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । फलटण । आज होत असलेला महादेव पोकळे यांच्या प्रवेश म्हणजे जो निष्ठेने काम करत असतात त्यांनी आपल्याकडे यावे असं आमचं मत असतं. सोमंथळी गावचे प्रश्न व सर्वसामान्य नागरिकांचे काम हे मला तुमच्या वडीलांच्या वेळी कळत होते. राजकारणाच्या तत्कालीन परिस्थिती नुसार तुम्ही पुर्वी वेगळे होता. तालुक्यांचा राजकारण जर आपण चांगल्यांच्या हातात दिलं नाही तर पुर्वीचे दिवस यायाला वेळ लागणार नाही. आता सद्य परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये वाजपेयीनंतर जर कोणी थोर नेते असतील तर ते म्हणजेच आदरणीय जयकुमार गोरेच असतील, असा टोला विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.

फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे महादेव पोकळे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फलटण तालुक्यातील विविध सेलचे पदाधिकारी व कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यामध्ये काम करून घ्यायची पद्धत आपण सुरू केली. दिल्लीत गेल्यावर स्व. यशवंतराव चव्हाण यांचाच जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याला ओळखले जाते, अश्या ह्या जिल्ह्यामध्ये आता कोणत्या प्रकारचे नेते तयार होत आहेत, हे नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहणे गरजेचे आहे. कार्यकर्यांना विकासाची व प्रश्नांची जाण असली पाहिजे. गटात असावे किंवा नसावे पण सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी होती व ह्या पुढे असेल, असा विश्वास यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

आज महादेव पोकळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. ते ह्या पूर्वी खासदार गटामध्ये कार्यरत होते. खासदार यांच्या कार्यपद्धतीनुसार आगामी काळामध्ये तालुक्यातील खासदारांच्या गटामध्ये खासदार स्वतः व त्यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकरच शिल्लक राहतील. त्यांचे बाकीचे कार्यकर्ते हे आपल्याकडे येतील किंवा घरी बसतील, असा टोला सुद्धा यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.

मागील काही दिवसांपूर्वी आदरणीय गोरे साहेब म्हणत होते कि, आता ह्या उत्तर वयात नातवंडासोबत बसा. मी नातवंडासोबत बसू शकतो परंतु मला त्यांना एक विचारायचे आहे कि, तुम्हाला मुल व संसार किती हे स्पष्ट करा आणि मग नातवंडे किती हे सांगा. सातारा जिल्ह्याचे असल्या ह्या लोकांच्यामुळे जिल्ह्याचे नाव खराब होत आहे. गोरे व खासदार हे दुक्कल मुंबई मधील ट्रायडंट हॉटेल मध्ये बसून असतात व तिथूनच जिल्ह्यासह तालुक्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असतात. कोरेगावच्या कॉरिडॉर एमआयडीसीबाबतचा निर्णय हा केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सीतारमण यांनी घेतलेला आहे. राज्याची व केंद्राची एमआयडीसी हे वेगवेगळे प्रकल्प असतात. त्यामध्ये म्हसवडला सुद्धा एमआयडीसी होवू शकते. फलटणला राज्याचीच एमआयडीसी आहे परंतु फलटणला आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरु आहेतच ना ?, असेही यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

खासदारांचा धंदा एकच आहे तो म्हणजे नवं, जुनं करणं. आपल्या तालुक्यातील नागरिकांना माहित नसेल परंतु किचनमधील मिक्सर किंवा इतर अवजारे दुरूस्त करायचा डिप्लोमा कदाचित माझ्याकडून डिप्लोमाचं नाव चुकत असेल हे खासदारांचे शिक्षण झालं आहे. खासदारांचे कुठं शिक्षण झाले हेच शोधायला पाहिजे. आता तालुक्यामध्ये तडीपारीची केस फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांवरच का ? सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सध्या चालु आहे. असे काही केले तरी व खासदारांनी कितीही ठरवले तरी तालुक्यातील नागरिकांचे मनपरिवर्तन करण्यामध्ये खासदार कधीही यशस्वी होणार नाहीत, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

महादेव पोकळे यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळणार आहे. राज्यात भाजपा व शिंदे गटाचे सरकार आहे, तरी आज जो फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेच आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये गेली तीस ते पस्तीस वर्षे जे समाजकारण व राजकारण करित आहेत त्यामुळेच हे शक्य आहे. शिक्षण, आरोग्य व कृषी क्षेत्रात श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वात श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजेंच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व जण कार्यरत आहोत. सर्वसामान्य नागरिकांच्या कोणत्याही अडीअडचणीला ठामपणे मागे उभे राहण्याचे काम फलटणचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत असते, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

प्रवाहासोबत असताना तालुक्यातील एक व्यक्ती उलट्या प्रवाहात येणे हीच मोठी गोष्ट आहे. आपल्या गटात कोणाचाही प्रवेश करताना गटातील जुन्या जाणत्यंसह सर्वांनो विचाराच घेण्याचे काम गटातील सर्वच जण करत असतात. राजे गटातील सर्व कार्यकर्ते हे भावनेने बांधले गेले आहेत. सत्तांतर झाल्यावर जहाजातुन उंदरे उड्या मारतात परंतु प्रवाहाच्या विरोधात जाउन दमदार मासाच पोहत असतात ते इतर दमदार मास्यांच्या सोबत जातो व प्रवाहाचा विरोध मोडून काढतो. महादेव पोकळे यांचा प्रवेश म्हणजे पोकळे हे दमदार मासा आहेत. राजे गटीतील कोणालाही न दुखवता पोकळेंना योग्य तो सन्मान आपल्या गटात केला जाईल, असे मत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

प्रवाहाच्या उलट्या प्रभावात येण्याचे काम महादेव पोकळे करत आहेत. भाजपा मधून राष्ट्रवादीमध्ये येणे म्हणजेच प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे काम महादेव पोकळे करत आहेत. विकोधक कसा असावा ? तर महादेव पोकळेंच्यासारखा असावा, राजकारणात विरोधात असुन सुद्धा विकासकामांना साथ देण्याचे काम महादेव पोकळे कायम करत होते. आता कोणालाही ईडीची कारवाई होवू शकते, असं असुन सुद्धा महादेव पोकळे जर राष्ट्रवादीत येत आहेत, हीच मोठी गोष्ट आहे. परंतु आपण कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही कारण आपल्या पाठीशी शरद पवार व अजित पवार पाठीशी ठामपणे आहेत. महादेव पोकळे यांना कामाची तळमळ आहे. आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात महादेव पोकळे विविध विकासाची कामे नक्कीच मार्गी लावतील, असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

महादेव पोकळे यांनी विरोधात असून सुध्दा विकासाच्या कामामध्ये विरोध केला नाही. पोकळे राजकिय विरोध करत होते, तर ते सामाजिक कार्यात नेहमीच सोबत असायचे. कधीही पातळी सोडून महादेव पोकळे वागले नाहीत. राज्याच्या व देशाच्या राजकारणाचा फलटणमध्ये कधीही शिंतोडे उडले नाहीत. परंतु आता खालच्या पातळीवर जावुन विरोधक राजकारण करत आहेत, असे मत श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी दिल्याबद्दल पोकळे परिवाराच्या वतीने आभार मानत आमच्या वडीलांनी आमच्यावर टिका करण्याचे संस्कार केले नाहीत. आपले काम करून दाखवणे, हाच संस्कार आमच्या वडिलांनी आमच्यावर केला आहे. भाजपात राहिलेले काही कार्यकर्ते येणाऱ्या कालावधीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आणण्याचे काम करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबुत करण्याचे काम आता ह्या पुढे मी करणार आहे. देशात व राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी तालुक्यात सत्ता ही श्रीमंत रामराजेंचीच राहणार आहे. तुम्ही कोणालाही निवडणुकीत उतरावा परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तुम्ही सोडवावेत, यांच्यासाठीच मी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे मत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!