प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर काॅलेजच्या कु.राज कर्वे याची नॅशनल कम मेरिट मीन्स स्कॉलरशिप(NMMS) परीक्षेत निवड


दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस ( नॅशनल मेरिट मीन्स स्कॉलरशिप) शिष्यवृत्ती परीक्षा 2021 – 22 मध्ये सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता नववीचा विद्यार्थ्यी कु.राज जयवंत कर्वे याने 115 गुणांसह उज्वल यश संपादन केले आहे व त्याची शिष्यवृत्ती (Rs.48000/-) साठी निवड झालेली आहे.या यशाबद्दल त्याचे सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप माने, संस्थेचे सचिव श्री.विशाल पवार, व्यवस्थापकिय संचालिका सौ. संध्या गायकवाड,कोषाध्यक्षा सौ.सविता माने, संचालिका सौ. प्रियांका पवार, प्राचार्य श्री.संदीप किसवे, पर्यवेक्षक श्री.अमित सस्ते, समन्वयिका सौ. माधुरी काटकर, सौ.सुवर्णा निकम, श्रीमती योगिता सस्ते, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!