सभासद शेतकऱ्यांच्या बळावरच मार्गक्रमण करू – मदन भोसले


स्थैर्य, भुईंज, दि.१: किसन वीर साखर कारखाना यंदा आपला ५० वा गळीत हंगाम साजरा करीत आहे. कारखान्याची सुत्रे शेतकरी सभासदांच्या विश्वासावर हाती घेतल्यानंतर सभासद, कर्मचारी आणि कारखान्यासाठी उपयुक्त घटकांनी घेतलेल्या सहकार्याच्या भुमिकेमुळे कार्यस्थळावर अनेक नवनवीन प्रकल्प उभे करता आले. याचा विशेष आनंद मला व माझ्या व्यवस्थापनास आहे, परंतु गेल्या काही वर्षात साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. नैसर्गिक आणि आर्थिक संकटामुळे आपल्या उत्पादकतेवर प्रतिकुल परिणाम झाला. या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी सभासद व कामगारांनी दाखविलेला चांगुलपणा आणि केलेल्या सहकार्याबद्दल मी माझे व्यवस्थापन कृतज्ञता व्यक्त करतो. आजपर्यंत अनेक संकटे उभी राहीली परंतु आपल्या सर्वाच्या सहकार्याच्या भावनेतुन त्या संकटावर मात करता आली आणि येणाऱ्या अरिष्टांवरही शेतकरी सभासदांच्या विश्वासावर मात करणार असल्याचे प्रतिपादन, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले.

येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या ४९ व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे कार्यस्थळावरुन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पध्दतीने व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विविध विषयांवर विचार करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मदनदादा भोसले पुढे म्हणाले, करोनाच्या पार्श्वभुमीवर व शासनाच्या नियमानुसार ही सभा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने होत असल्याचे सांगितले तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करून सभेत उपस्थिती दाखवत जो व्यवस्थापनावर विश्वास दर्शविला त्याबद्दल सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. कारखान्याची सुत्रे हाती आल्यानंतर कारखान्यावर अनेक नवनविन प्रकल्प उभारले. शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना संस्थेचे नुकसान होऊ नये याची दक्षता नेहमीच घेत आलो. संस्थेच्या हितास बाधा येईल असे वर्तन कधीही माझ्याकडून अथवा व्यवस्थापनाकडून झालेले नाही व यापुढील काळातही होणार नाही. शेतकरी सभासद हे कारखान्याचे मालक असून त्यांना कारखान्याविषयी माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. यावेळी ऑनलाईन सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी सभासदांना दिली.

यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. स्वागत संचालक नंदकुमार निकम यांनी केले. दुखवट्याचा ठराव संचालक चंद्रकांत इंगवले यांनी मानले. विषय पत्रिकेचे वाचन सचिव एन. एन. काळोखे यांनी केले. यावेळी संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रविण जगताप, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक शिंदे, उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!