दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
माऊली फाऊंडेशन मुंबईतर्फे आषाढीवारी सोहळ्यानिमित्त मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालयाकडून उभ्या महाराष्ट्रातील तरुणांना अभ्यासू आणि तडफदार वक्ते म्हणून परिचित असणारे तसेच झी टॉकीजवरील गजर कीर्तनाच्या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. गणेश शिंदे यांचे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केले आहे.
हे व्याख्यान सोमवार, दि. ८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे होणार असून या व्याख्यानाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालयाकडून करण्यात आले आहे.