लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने प्रा.सुमित उरकुडकर यांचे व्याख्यान


दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । बारामती । बारामती तालुक्यातील अग्रगण्य डिजीटल अँकॅडमी म्हणून नावारूपास आलेल्या लडकत सायन्स अँकॅडमी च्या वतीने सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. सुमित उरकुडकर यांचे यशाची गुरकिल्ली सुजाण पालकतव्य व मुलांचा अभ्यास आणि १०वी नंतर काय ? या विविध विषयांवर पालक व पाल्य यांच्यासाठी व्याख्यान होणार आहे.

तसेच नीट जेईई एमएचटी सीईटी ची पूर्व तयारी करून घेण्यासाठी ११वी प्रवेशाकरीता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा कार्यक्रम स्थळी होणार आहे सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक उपयोगी साहित्य बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहे .
रविवार २२ जानेवारी रोजी मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक,सुर्यनगरी येथे होणार असून सकाळी ९ ते १० नावनोंदणी सकाळी १० ते ११ स्कॉलरशिप परिक्षा व सकाळी ११ते दु १. व्याख्यान व बक्षिस वितरण होणार असून इच्छुक विद्यार्थी व पालक यांनी सदर कार्यक्रमास उपस्तीत राहण्याचे आवाहन लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने प्रा. नामदेव लकडत व प्रा गणेश लडकत यांनी केले आहे.
नाव नोंदणी ९५४५१५२५४७/९५४५१५२६४७ या नंबर वर संपर्क साधावा असेही आव्हान करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!