‘भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू’; अजित पवारांचे भाजप आमदारांना आवाहन


 

स्थैर्य, दि.१६: हातकणंगले विधानसभा
मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा
जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख
उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित
पवार यांनी भाजपमधील आमदारांना राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले.

यावेळी
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि
राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना
निर्माण व्हायला लागली आहे. एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आज राजीव
आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जे कुणी भाजपचा
राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच
उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न
करू’, असे पवार म्हणाले.

पवार
पुढे म्हणाले की, ‘विविध पक्षातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.
मागील वेळेस विरोधकांकडून अनेक प्रलोभने, आमिषे दाखवून आमच्या पक्षातील
नेत्यांना त्यांच्या पक्षात नेण्यात आले. काही लोकांना भीती दाखवून
फोडण्याचा प्रयत्न झाला. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजून अनेक नेते
तिकडे गेले होते. पण आता त्यांनाही आपण आघाडी सोडून का गेलो? असे वाटायला
लागलं आहे,’ असे पवार म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!