तुरूंगातून बाहेर येताच लल्लन टोळी पुन्हा सक्रिय; व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | सातारा |
दत्ता जाधवचा मुलगा लल्लन जाधव याने तुरूंगातून बाहेर येताच एका व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पैलवान विक्रम वाघमारे हे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती अशी की, दत्ता जाधव यांचा मुलगा नुकताच मोक्का गुन्ह्यातून सुटून बाहेर आला आहे. शनिवारी रात्री १२ ते १ च्या सुमारास प्रतापसिंह नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर त्याने आणि त्याच्या सहा साथीदारांनी भंगार व्यावसायिक पैलवान विक्रम वाघमारे याच्यावर धारधार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यात विक्रम वाघमारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी लल्लन जाधवसह आणखी सहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेनंतर लल्लन व त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संपूर्ण प्रतापसिंहनगर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागील भांडणातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!