• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सरपंचांच्या कार्यशाळेत ग्वाही

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
फेब्रुवारी 26, 2023
in सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२३ । सातारा । गावच्या विकासात ग्रामपंचायतचा मोठा वाटा आहे .शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावच्या विकासाबरोबर गावातील नागरिकांना रोजगार कसा मिळेल यासाठी सरपंच व सदस्यांनी प्रयत्न करावे तसेच विकास कामांसाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभराज देसाई यांनी दिली.

पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवशीय कार्यशाळा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर ,ता.पाटण येथे आयोजित करण्यात आली. या एकदिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी ,जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे,रविराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पध्दतीने करण्याबरोबर शासनाच्या विविध योजना ह्या ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पाटण तालुका डोंगरी भाग असून या डोंगरी भागाच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देत आहे या निधीमधून लोक उपयोगी विकास कामे दर्जेदार करावीत. कामाचे प्रस्ताव योग्य पद्धतीने तयार करून संबंधीत विभागाला पाठवावे.

जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास शाळा आदर्श शाळा करण्यात येणार आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर भौतिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा ही उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या दोन्ही उपक्रमांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घ्यावा. या उपक्रमाला नाविन्यपूर्ण योजनेतून तसेच शासनाच्या विविध योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असेही पालकमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण यासाठी विविध योजनेतून निधी मिळतो हा निधी मिळवण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. गावच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता एकजुटीने विकास कामे करावी. विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डुड्डी म्हणाले सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा उपक्रम व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या ह्या योजनांमध्ये लोकसहभाग घेतल्यामुळे या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठी मदत झाली. देशभरात जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या नळ कनेक्शन मीटर बसवण्यात यावे यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास मोठी मदत होईल. शासनाची कोणतीही योजना राबवत असताना लोकसहभाग घ्यावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.

या कार्यशाळेत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Previous Post

कोटी लिंगार्चन आणि लक्षभोजन सोहळ्याची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

Next Post

व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कची फलटण शहरासह तालुक्यात बोंबाबोंब; कॉलिंग आणि इंटरनेट वारंवार होतेय खंडित

Next Post

व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कची फलटण शहरासह तालुक्यात बोंबाबोंब; कॉलिंग आणि इंटरनेट वारंवार होतेय खंडित

ताज्या बातम्या

वडूज ता. खटाव येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीतील कार्यकर्ते

रिपब्लिकन पक्षाच्या सन्मानासाठी खटाव शेती बाजार समितीच्या रिंगणात – गणेश भोसले

मार्च 30, 2023

मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करू – उद्धव ठाकरे

मार्च 30, 2023

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

मार्च 30, 2023

तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

मार्च 30, 2023

“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मार्च 30, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मार्च 30, 2023

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल – मुनगंटीवार

मार्च 30, 2023

कोळकीच्या नागरिकाची रस्ता डांबरीकरणासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन तक्रार; ग्रामविकास अधिकार्‍यास धरले धार्‍यावर

मार्च 30, 2023

गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

मार्च 30, 2023

घरकुल योजनेत भ्रष्टाचार; ५ हजार रुपये घेऊन होतेय लाभार्थ्याची निवड; ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी खात आहेत कमिशन

मार्च 30, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!