कऱ्हाडात अधिकाऱ्यांचे घनकचरा प्रकल्पात श्रमदान; नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांचा सहभाग


 

स्थैर्य, कराड, दि.२१: कऱ्हाड नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात श्रमदान केले. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील एमआरपी सेंटरमध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून कचऱ्यापासून कलाकृती करण्यासाठी कचऱ्यातील बारीक केलेले प्लॅस्टिक बाटल्यामध्ये एकत्रित केले. 

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रमदानात भाग घेतला. येथील पालिकेने वर्गीकृत कचरा बारा डबरे येतो. तेथे कचऱ्यातील प्लॅस्टिकचे तुकडे विलग केले जातात. त्यापासून कलाकृती तयार करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेतील आरोग्य विभाग वगळता अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रमदानासाठी प्रकल्पात बोलावले.

दररोज काम करणाऱ्या आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सुटी दिली होती. नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी डाके यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी त्यात सहभागी झाले. श्रमदानातून कलाकृतीसाठी कामही केले. कचऱ्यातील प्लॅस्टिकचे तुकडे बाटलीमध्ये भरण्याचे काम त्यांनी केले. आणखी काही दिवस श्रमदान होणार आहे. त्यानंतर कचऱ्यापासूनची कलाकृती बनवली जाणार आहे, असे डाके यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!