फलटण: जाधववाडीच्या कृष्णा भांबुरेचे दहावीत ‘शतप्रतिशत’ यश; सर्व विषयांत मिळवले १०० टक्के गुण


जाधववाडी (ता. फलटण) येथील कृष्णा विष्णू भांबुरे याने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून शतप्रतिशत यश संपादन केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 12 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत जाधववाडी (ता. फलटण) येथील चि. कृष्णा विष्णू भांबुरे याने १०० टक्के गुण मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्याने सर्व विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १०० पैकी १०० टक्के गुण प्राप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

कृष्णाने मिळवलेले हे यश त्याचे कठीण परिश्रम, समर्पण आणि चिकाटीची सुफळ कामगिरी असल्याचे गौरवोद्गार काढले जात आहेत. कोणत्याही एका विषयात नव्हे तर सर्वच विषयांत १०० टक्के गुण मिळवल्याने त्याच्या या अभूतपूर्व यशाचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. या शतप्रतिशत यशामुळे जाधववाडी गावाच्या आणि फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Back to top button
Don`t copy text!