MPSC परीक्षेत कोमल भोसले यांची बाजी; राज्य कर निरीक्षकपदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षक (STI) पदी निवड झालेल्या कोमल भोसले यांचा फलटणमध्ये विशेष सत्कार करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवून राज्य कर निरीक्षक (STI) या प्रतिष्ठित पदावर निवड झालेल्या कोमल रवींद्र भोसले यांचा फलटणमध्ये विशेष सन्मान करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करून त्यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

कोमल भोसले यांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे माजी पदाधिकारी बाबासाहेब जगताप आणि पारिजातका जगताप यांच्या पुढाकाराने हा गौरव करण्यात आला. याप्रसंगी महावीर भालेराव, आनंद जगताप, मुंबई पोलीस दलातील अधिकारी प्रफुल्ल मोरे आणि वर्षा मोरे यांच्यासह भोसले कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश

कोमल भोसले यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे फलित आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हे यश अतिशय प्रेरणादायी मानले जात आहे. समाजातील इतर विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून मोठी ध्येये निश्चित करावीत, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

Back to top button
Don`t copy text!