कोळकी: ग्रामपंचायत प्रभागरचना व आरक्षण जाहीर – १७ जागांसाठी रंगणार निवडणूक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण तालुक्यातील कोळकी ग्रामपंचायतीची सन २०२६ ची प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाले असून एकूण १७ जागांपैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

स्थैर्य, कोळकी, दि. १४ जून : फलटण तालुक्यातील कोळकी ग्रामपंचायतीची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना आणि आरक्षण अधिकृतपणे जाहीर झाले आहे. एकूण ८०५४ लोकसंख्या असलेल्या या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये ६ प्रभागांतून एकूण १७ सदस्य निवडले जाणार आहेत. या नवीन रचनेमुळे गावातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:

जाहीर झालेल्या सांख्यिकीय आराखड्यानुसार एकूण १७ सदस्यांपैकी ९ जागांवर महिलांचे वर्चस्व राहणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २ जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ना.मा.प्र.) ४ जागा आणि उर्वरित ११ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

  • प्रभाग १ (एकूण ३ जागा): ना.मा.प्रवर्ग (१), महिला सर्वसाधारण (१), सर्वसाधारण (१)

  • प्रभाग २ (एकूण २ जागा): अनुसूचित जाती (१), महिला सर्वसाधारण (१)

  • प्रभाग ३ (एकूण ३ जागा): महिला ना.मा.प्रवर्ग (१), महिला सर्वसाधारण (१), सर्वसाधारण (१)

  • प्रभाग ४ (एकूण ३ जागा): ना.मा.प्रवर्ग (१), महिला सर्वसाधारण (१), सर्वसाधारण (१)

  • प्रभाग ५ (एकूण ३ जागा): महिला अनुसूचित जाती (१), महिला ना.मा.प्रवर्ग (१), सर्वसाधारण (१)

  • प्रभाग ६ (एकूण ३ जागा): महिला सर्वसाधारण (२), सर्वसाधारण (१)

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

कोळकी गावामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १००३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १०३ इतकी आहे. नवीन आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक प्रभागांमधील जुन्या इच्छुकांची गणिते बदलली असून महिलांसाठी बहुतांश जागा आरक्षित झाल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरक्षण निश्चितीनंतर राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Back to top button
Don`t copy text!