बाणगंगा नदी पुलावर १५ ऑगस्ट रोजी पतंग स्पर्धेचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटणच्या बाणगंगा नदी पूल येथे स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता श्रीमंत अनिकेतराजे मित्रमंडळ पतंग स्पर्धेचे आयोजन पै. पप्पूभाई शेख मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण आ. दीपक चव्हाण व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे.

या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पै. पप्पूभाई शेख मित्र मंडळाकडून करण्यात आले असून या स्पर्धेत चायनीज मांजा वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Back to top button
Don`t copy text!