किचन सिंकमधील ब्लॉक आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर; जाणून घ्या सोपी पद्धत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्वयंपाकघरात भांडी धुताना किंवा अन्नपदार्थ बनवताना किचन सिंकमध्ये पाणी साचणे किंवा दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, महागड्या क्लिनिंग प्रोडक्ट्सचा वापर न करता घरात उपलब्ध असलेल्या बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत बेसिन स्वच्छ करता येऊ शकते.

स्थैर्य, सातारा , दि. १६ नोव्हेंबर : किचन सिंकच्या पाइपमध्ये अन्नाचे बारीक कण, तेलकट थर आणि कचरा जमा झाल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. सिंकमधील साचलेले पाणी कढून घेतल्यानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक कप व्हिनेगर ओतावे. हे मिश्रण एकत्र आल्यावर होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे पाइपमधील चिकट थर आणि दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

पाच मिनिटे हे मिश्रण तसेच मुरू दिल्यानंतर शेवटी कोमट पाण्याने सिंक स्वच्छ धुवून काढावे. नियमितपणे ही खबरदारी घेतल्यास किचन बेसिनमधील दुर्गंधी आणि ब्लॉकेजची समस्या टाळता येऊ शकते, ज्यामुळे स्वयंपाकघरातील स्वच्छता राखणे सोपे जाते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!