
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण नगरपरिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बालकल्याण निधीतून शैक्षणिक साहित्य वाटप करून आवश्यक सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. 26 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती मोहिनी मंगेश हेंद्रे यांच्या बालकल्याण निधीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, पाणीपुरवठा समिती सभापती राहुल भैय्या निंबाळकर, उपसभापती कांचनताई व्हटकर, नगरसेविका अस्मिताताई लोंढे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
सुविधांची माहिती व आश्वासन
यावेळी नगरपरिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांची माहिती घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. बालकांचे शिक्षण, त्यांचा सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल भविष्य हेच ध्येय असल्याचे नमूद करण्यात आले.



