राज्यभरात २२ ऑक्टोबरपासून ‘खेत बचाओ अभियान’; शेतकऱ्यांच्या जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मोठी मोहीम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्यभरात २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान ‘खेत बचाओ अभियान’ राबवले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १७ ऑक्टोबर : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबवले जाणार आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी विद्यापीठांच्या समन्वयातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आणि उपक्रम

या विशेष मोहिमेदरम्यान माती परीक्षणावर आधारित खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन आणि पीक विविधीकरणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच भात पिकानंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्राचा कार्यक्षम वापर, जलसंधारण आणि पीक अवशेष न जाळण्याबाबत जनजागृती केली जाईल. क्षेत्रीय स्तरावर प्रक्षेत्र भेटी, शेतकरी मेळावे आणि प्रशिक्षणाचे आयोजन करून शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीचे धडे दिले जाणार आहेत.

शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन

रासायनिक खतांचा अतिवापर टाळून जमिनीची उत्पादकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळील कृषी कार्यालय किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!