दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत फलटण विधानसभा मतदार संघापैकी फलटण तालुक्यातील ६५ व कोरेगाव तालुक्यातील ६ अशा एकूण ७१ गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे घरात स्वच्छ, निर्जंतुक, पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यासाठी ५० कोटी ९१ लाख ७९ हजार रुपयांचा निधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंजूर करुन घेतला आहे. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दुरदर्शीपणे घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरावरुन कौतुक होत असून त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणा नुसार केंद्रीय जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची अत्यंत महत्वपूर्ण योजना देशभर राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेनुसार सन २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी देवून स्वच्छ, निर्जंतुक व भरपूर पाणी उपलब्ध करुन देण्याचे केंद्र सरकारचे महत्वपूर्ण धोरण आहे. ही योजना केंद्र शासनाची असून निधीही केंद्र शासनाकडून उपलब्ध होणार आहे. मात्र अंमलबजावणी व कामाची पूर्तता राज्य सरकार व जिल्हा परिषदांच्या माध्यमातून केली जात आहे.
या जलजीवन मिशन योजनेच्या केंद्रीय समितीमध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा समावेश असून त्यांनी जाणीव पूर्वक लक्ष देवून सातारा जिल्हाच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघासाठी ही योजना प्राधान्याने मंजूर करुन घेतली आहे, केवळ पुढील कार्यपूर्तीसाठी हा प्रस्ताव महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषदेकडे पाठविला जात आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील केंद्रीय जलजीवन मिशन योजनेतील गावे आणि गाववार उपलब्ध झालेला निधी आणि कामांची प्रगती खालील प्रमाणे आहे.
७१ गावे, गाववार मंजूर निधी, कामांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे. मानेवाडी २४.७२ लक्ष, शेरेचीवाडी (ढवळ) २४.८५ लक्ष, वेळोशी २४.९० लक्ष, वाघोशी २४.७० लक्ष अशा ४ गावासाठी एकूण ९९ लक्ष १७ हजार रुपये निधी मंजूर असून तेथील कामे प्रगती पथावर सुरु आहेत.
खडकी ३१.८१ लक्ष, आदर्की बु|| ८२.८८ लक्ष, आळजापूर २४.९४ लक्ष, बरड ५३.९९ लक्ष, बिबी ७६.३१ लक्ष, दऱ्याचीवाडी ४१.६५ लक्ष, दुधेबाबी ४४.२४ लक्ष, गोखळी ६०.१४ लक्ष, हणमंतवाडी ९७.४० लक्ष, जाधववाडी(ता) ५५.३३ लक्ष, जावली ८५.५९ लक्ष, कांबळेश्वर ११५.२५ लक्ष, काशीदवाडी २४.८० लक्ष, खटकेवस्ती ४१.८९ लक्ष, कोळकी ११८.१५ लक्ष, माळेवाडी १७.२२ लक्ष, माझेरी २१.८२ लक्ष, मिरढे ९१.१४ लक्ष, मुरुम ६४.०० लक्ष, परहर (बु||) १७.१४ लक्ष, परहर (खु||)१९.०५ लक्ष, पवारवाडी १२९.०० लक्ष, राजूरी ६१.२७ लक्ष, रावडी बु|| ९६.८९ लक्ष, साखरवाडी ७४.७२ लक्ष, सांगवी १७७.४२ लक्ष, साठे २४.९० लक्ष, शिंदेनगर ६०.५६ लक्ष, तडवळे ४२.६२ लक्ष, टाकळवाडे ५७.२५ लक्ष, टाकूबाईचीवाडी २४.८८ लक्ष, ताथवडा ६०.५४ लक्ष, विठ्ठलवाडी २४.९९ लक्ष, अशा एकूण ३३ गावांसाठी एकूण २० कोटी १९ लक्ष ७८ हजार रुपये निधी मंजूर करुन घेतला असून या गावांची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
ढवळ ९०.०० लक्ष, घाडगेवाडी ५५.०० लक्ष, हिंगणगाव १०१.१० लक्ष, कापशी २२.१३ लक्ष, नांदल १२५.०० लक्ष, सासवड १४०.०० लक्ष, सोनवडी खु|| ३०.०० लक्ष, वाखरी १२५.०० लक्ष, झडकबाईचीवाडी ८.९७ लक्ष, या ९ गावांसाठी एकूण ६ कोटी ९७ लक्ष २० हजार रुपये निधी मंजूर असून कामाची तांत्रीक मंजूरी मिळाली आहे.
आसू ११९.२९ लक्ष, चांभारवाडी ४९.७९ लक्ष, फडतरवाडी ४७.१८ लक्ष, घाडगेवाडी ६८.४५ लक्ष, गिरवी १६५.१० लक्ष, गुणवरे १९२.९१ लक्ष, कुरवली बु|| ४४.५३ लक्ष, कुसूर ६८.७३ लक्ष, मठाचीवाडी १३५.९५ लक्ष, मिरगाव ११२.८४ लक्ष, मुळीकवाडी ६२.८२ लक्ष, मुंजवडी १४७.६५ लक्ष, पाडेगाव ९९.३३ लक्ष, सालपे ९९.९८ लक्ष, सावंतवाडी ६९.०८ लक्ष, सुरवडी १३०.९३ लक्ष, तांबवे ५८.२८ लक्ष, वडले १३० .९८ लक्ष, वडजल ४२.५९ लक्ष, इतका निधी उपलब्ध झाला आहे.
फलटण तालुक्यातील या १९ गावांसाठी एकत्रित १८ कोटी ४६ लक्ष ४१ हजार रुपये निधी अंदाजपत्रक मंजूरीस सादर केला आहे.
कोरेगाव उत्तर मधील ६ गावांचा या योजनेत समावेश असून खालील प्रमाणे निधी मंजूर आहे.
अनपटवाडी ६८.८४ लक्ष, फडतरवाडी ३०.३९ लक्ष, जाधववाडी ५३.७६ लक्ष, नायगाव २४.९९ लक्ष, पिंपोडे १९९ लक्ष, राऊतवाडी ५२.२५ लक्ष असा ६ गावांसाठी ४ कोटी २९ लक्ष २३ हजार रुपये निधी मंजूरीस सादर केला आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर या योजनेबद्दल भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य, फलटण व कोरेगावचे भाजपा तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष व सर्व मोर्चा, आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे. मतदार संघात आनंदाचे वातावरण आहे.