• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आरोग्याला जपणे आपल्या हातात – अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले

महिलांसाठी सर्वरोग मोफत निदान व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 11, 2023
in फलटण

दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२३ | फलटण |
आजच्या धावपळीच्या युगात महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. महिला स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत, या जाणिवेतून सर्वरोग मोफत निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याला जपणे आपल्या हातात असून आपले आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता निश्चितच हे शिबिर उपयोगी ठरणार आहे. या शिबिरासाठी सेवासदन लाईफ लाईन संस्थेचे होत असणारे सहकार्य व कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी केले.

जागतिक महिला दिन निमित्ताने श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूह फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, श्रीराम बझार व स्वयंसिद्धा महिला संस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सर्वरोग मोफत निदान व मोफत उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून अ‍ॅड. सौ. भोसले बोलत होत्या. यावेळी श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, श्री सद्गुरू गृह तारण संस्थेचे चेअरमन तुषार गांधी, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, सेवा सदन लाईफ लाईनचे डॉक्टर, स्वयंसिद्धाच्या संचालिका उपस्थित होत्या.

अ‍ॅड. सौ. भोसले म्हणाल्या, स्वतःचे आरोग्य जर आपण जपले तरच आपण आपले कुटुंब व्यवस्थित जगवू शकतो, म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांनी अशा मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. यावेळी डॉ. प्रियांका गायकवाड, डॉ. रेवती पवार, डॉ. प्रसाद कवारे यांनी रोग निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक श्री. दिलीपसिंह भोसले यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

या शिबिरास डॉ. राहुल वालेकर, डॉ. दिव्या मॅडम, डॉ. सिमरन, डॉ. किरण मॅडम, डॉ. लता बाबर, रवींद्र बाबर त्याचबरोबर सागर भोसले व सर्व सहकारी यांनी महिलांच्या आरोग्याची तपासणी व उपचार केले. बहुसंख्य महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. ब्रिलियंट अकॅडमीचे कु. रितू कहार व कु. धनश्री तेली यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी स्वागत केले. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले.


Previous Post

जिंती, भिलकटी व ठाकुरकी येथे महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न

Next Post

आळंदी व पंढरपूर धार्मिक स्थळांना जोडणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची ना. नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी

Next Post

आळंदी व पंढरपूर धार्मिक स्थळांना जोडणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची ना. नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्या

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात

मार्च 21, 2023

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत

मार्च 21, 2023

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात – नितेश राणे

मार्च 21, 2023

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

मार्च 21, 2023

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मार्च 21, 2023
वडूज ता.खटाव येथील भूमी अभिलेख कार्यालय फलका नजीक पडलेल्या रिकाम्या बाटल्या

वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण?

मार्च 21, 2023

शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष

मार्च 21, 2023

रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

मार्च 21, 2023

महिला बचत गट उत्पादित वस्तुंचे २४ ते २६ मार्च कालावधीत प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मार्च 21, 2023

उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मार्च 21, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!