
दैनिक स्थैर्य । 20 मे 2025 । फलटण । येथील ‘के. बी. एक्सपोर्ट इंटरनॅशनल’ या शेतमाल निर्यात क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेला माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती क्षेत्रात ते करत असलेलं कार्य प्रेरणादायी आहे. शेतीचं, शेतकऱ्यांचं सशक्तीकरण व कृषिप्रधान भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा नवोन्मेषी उपक्रमांची नितांत गरज आहे, असे मत यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी फलटण येथील के. बी. एक्सपोर्ट इंटरनॅशनल या कंपनीला सदिच्छा भेट दिली. यावेळी सौ. प्रतिभा पवार, युवा नेते युगेंद्र पवार, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, के. बी. उद्योग समुहाचे संचालक सचिन यादव यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केबी उद्योग समूहाच्या कामकाजाबद्दल माहिती घेतली व आगामी काळामध्ये कंपनीसाठी सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याची ग्वाही दिली.