युपीएससी परीक्षेत यश मिळवून कमलकिशोर कंडारदर यांनी वेगळा आदर्श निर्माण केला : श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर


दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | फलटण | कमलकिशोर कंडारकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवुन जैन समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे, असे मत फलटण नगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे ना.निंबाळकर यांनी व्यक्त केले. सामाजीक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या जैन सोशल ग्रुप, फलटण ने आयोजित केलेल्या विशेष सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.

नुकत्याच घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परिक्षेत लातुर येथील जैन समाजातील कमल किशोर देशभूषन कंडारकर यांनी ऊज्वल यश मिळवुन भारत देशातुन 137 वी रॅक मिळवल्याबद्दल, तसेच श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅकेवर कार्यकारी संचालकपदी निवड झाल्याबद्दल फलटणमधील प्रसिध्द कर सल्लागार अ‍ॅड.शैलेंद्र शहा यांचा व जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन व जैन सोशल ग्रुप महाराष्ट रिजन कमीटीवर निवड झाल्याबद्दल मंगेश दोशी, पर्युषन पर्वामधे ऊपवास -तप केल्याबद्दल श्रावक-श्रावीका, लहान मुले-मुली याचां आदींचा सत्कार या समारंभात पार पडला.

श्रीमंत सुभद्राराजे यांनी यावेळी बोलताना, जैन सोशल ग्रुपच्या या उपक्रमाबद्दल प्रशंसा करुन कमलकिशोर कंडारकर यांनी मराठी भाषेत शिक्षण घेउन सुध्दा युपीएसी सारख्या सर्वोच्च परिक्षेत यश मिळवता येते हे दाखवुन दिले असुन तरुण पीढीला तसेच जैन समाजाला आदर्श घालुन दिल्याचे प्रतिपादन केले.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता म्हणाले, इतके दिवस बाहेरच्या राज्यांतील विद्यार्थी युपीएससी.परिक्षेत यश मिळवत होते. परंतु आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातुन तरुण-तरुणी या परीक्षेत चमकुन उच्च पदावर जात आहेत. फलटण पत्रकार संघाच्या माध्यमातुन तालुक्यातील होतकरु विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त असे सुसज्ज वाचनालय मोफत सुरु केल्याचे सांगुन या वाचनालयाामुळे आजपर्यत फलटण ग्रामीण भागातुन अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणुन उच्च पदावर गेल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

शैलेद्र शहांसारख्या तज्ञ व्याक्तीची श्रीमंत मालोजीराजे सह.बॅकेच्या कार्यकारी संचालकपदी निवड झालयामुळे बँकेला निश्‍चितच फायदा होईल. मंगेश दोशी यांची जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजन कमीटीवर निवड झाल्याने फलटण जैन सोशल ग्रुपला रिजन मार्फत अनेक योजना राबवता येतील असे सांगुन सर्व सत्कार मुर्तीना तसेच ऊपवास केलेल्या भावी श्रावक-श्रावीकांना शुभेच्छा देऊन अरविंद मेहता यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी कमल किशोर कंडारकर यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व मोत्याची माळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.शैलेंद्र शहा, मंगेशशेठ दोशी व ऊपवास केलेल्या 15 मुले-मुली याचां सन्मानपञ, शाल-श्रीफळ व मोत्याची माळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने करण्यात आली. विनयश्री दोशी, निना कोठारी, अपर्णा जैन यांनी मंगलाचरण सादर केले.

या कार्यक्रमासाठी सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिरभई गांधी, विद्यमान अध्यक्ष विरकुमार दोशी, माजी अध्यक्ष नवजीवन दोशी, अरिंजय काका शहा, साप्ताहिक आदेश चे संपादक विशाल शहा, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ.सुर्यकांत दोशी, सचिव श्रीपाल जैन, खजिनदार प्रीतम शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, डॉ.संतोष गांधी, उपाध्यक्षा डॉ.राजश्री गांधी, ईव्हेंट चेअरमन अतुल कोठाडीया, मेंबर शीप ग्रोथ चेअरमन डॉ.अशोक व्होरा, संचालक डॉ.मिलिंद दोशी, संगीनी फोरम माजी अध्यक्षां निना कोठारी, अ‍ॅड.देशभूषन कंडारकर, अनुप साखरे, मंञालय कक्ष अधिकारी सुनिल रणदिवे, प्रभाकर नाकील, रमणलाल रणदिवे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूञसंचालन दिप्तीभाभी राजवैद्य यांनी केले. प्रास्ताविक मंगेशशेठ दोशी यांनी केले. आभार अध्यक्ष डॉ. सुर्यकांत दोशी यांनी मानले.

कार्यक्रमासाठी जैन समाज बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!