वावरहिरे येथे थोर समाज सुधारकांची सयुंक्तपणे जयंत्ती साजरी


स्थैर्य, वावरहिरे (अनिल अवघडे) : वावरहिरे येथे  लोकशाहिर आण्णाभाऊ साठे तरुण मिञ मंडळ व श्री महालक्ष्मी सांस्कृतिक, कला व क्रिडा मिञ मडंळ यांच्या वतीने विश्वरत्न,साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्धी निमित्त साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुध्द, छञपती शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, वस्ताद लहुजी साळवे, आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजीराजे नाईक, राजमाता अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांची व थोर समाजसुधारकांची  संयुक्तपणे जयंती साजरी करण्यात आली. 

वावरहिरे गावचे सरपंच चंद्रकांत दादासो वाघ यांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपञ परिक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्री पाणलिंग विद्यालयातुन  विवेक हणमंतराव अवघडे याने 94.80% गुण प्राप्त करुन दहावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तसेच दहावी, बारावी परिक्षेत  उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गावचे सरपंच चंद्रकांत वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान जेष्ठ नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. मंडळातील सर्व युवकांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळुन गावातील परिसर स्वच्छ केला.यावेळी लो. आण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळालेले गोरखनाथ अवघडेसर, माजी सरपंच बाळासो अवघडे, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी जाधव, संदिप अवघडे, किरण संपतराव अवघडे, नामदेव भुजबळ, आप्पासो कवळे, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर अवघडे, हणमंत बाबासो अवघडे, खशाबा चव्हाण, शब्बीर पठाण, शिवाजी भोसले, पांडुरंग जाधव, सिताराम अवघडे, माजी सैनिक उत्तम अवघडे, राहुल अवघडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!