
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 07 ऑक्टोबर 2023 | फलटण | तुम्हारे गेल्या अर्ध्या तासापासून फलटण शहरासह परिसरामधील जिओ कंपनीची रेंज गेल्याने वापर करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक जिओ युजर शेजारील असणाऱ्या वापरकर्त्यास जिओची रेंज आहे का ? असा प्रश्न विचारत आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये जिओची रेंज अचानक जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. साधारण अर्धा ते एक तासासाठी अचानक रेंज गायब होत आहे. काही महिन्यांपूर्वी फलटण शहर तालुक्यामधील विविध भागांमध्ये 5G सुविधा जिओकडून सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर असे प्रॉब्लेम लागलेले आहेत.
