जिजाऊ भवन मध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । बारामती । बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या सयूंक्त विद्यमानाणे गुरुवार १२ जानेवारी रोजी जिजाऊ भवन येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रांताधिकारी दादासो कांबळे व तहसीलदार विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे व सर्व विश्वस्त आणि जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे व संगीता ढवाण,जयश्री सातव,छाया कदम व जिजाऊ सेवा संघाच्या उपाध्यक्षा :- स्वाती ढवाण, कार्याध्यक्षा :-सुनंदा जगताप, उपकार्यध्यक्षा:-प्रतिभा बर्गे, सचिव:-ज्योती खलाटे, सहसचिव:-सारिका परकाळे, खजिनदार:- संगीता शिरोळे, सहखजिनदार:- अर्चना परकाळे व इतर सदस्या व बारामती शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्तीत होते.

या प्रसंगी महिलांनी जिजाऊ वंदना सादर केली तर कृष्णाई किंग फायटर कराटे क्लब उद्यमाईवाडी च्या विद्यार्थ्यांनी लाठी काठी, दानपट्टा,लाठी काठी आदी चित्तथरारक कसरती सादर केल्या. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले

Back to top button
Don`t copy text!