जाधववाडीतील श्री बिरोबा देवाची वार्षिक यात्रा रद्द; देवस्थान ट्रस्टचा भाविकांना मोठा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणारी वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ : फलटण तालुक्यातील जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरदेव देवस्थानच्या श्री बिरोबा देवाची २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी होणारी वार्षिक यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टने यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिकृत माहिती दिली असून, भाविकांसह व्यापारी व स्टॉलधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांनी प्रवासाचे नियोजन टाळावे

जाधववाडी येथील श्री बिरोबा देवाच्या वार्षिक यात्रेला मोठा धार्मिक वारसा असून यात्रेनिमित्त दरवर्षी विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, यावर्षी २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान यात्रेचे कोणतेही आयोजन करण्यात येणार नाही. त्यामुळे भाविकांनी या कालावधीत जाधववाडी येथे येण्याचे नियोजन करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा प्रशासनालाही लेखी कळविण्यात आले आहे.

व्यावसायिकांना स्टॉल न उभारण्याचे आवाहन

यात्रेच्या काळात विविध वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यात्रा रद्द झाल्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने किंवा स्टॉलधारकाने दुकाने उभारण्यासाठी येऊ नये, असे ट्रस्टने म्हटले आहे. सर्व भाविक व नागरिकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!