कोळकीच्या मालोजीनगरात श्री हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा उत्साहात


दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण शहराचे उपनगर समजल्या जाणार्‍या कोळकी येथील मालोजीनगरमध्ये असणार्‍या श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.

मालोजीनगरात मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६.१७ वाजता श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला गेला. या दिवशी पहाटे ५. ०० वाजता अभिषेक, सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत कोळकी येथील महिला मंडळाचे भजन व त्यानंतर महाप्रसादाचे संध्याकाळी ७.०० ते १०.०० वाजेदरम्यान वाटप करण्यात आले.

श्री हनुमान जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत तिरकवाडी येथील श्री दुर्गा भजनी मंडळाचे भजन झाले.


Back to top button
Don`t copy text!