घाडगेमळा येथे ‘जावडी उद मांजरा’स मिळाले जीवदान


दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण येथील घाडगेमळा (ता. फलटण, जि. सातारा) येथील शेतकरी सतिश घाडगे यांच्या विहिरीमध्ये ‘जावडी उद मांजर’ (Indian Small Civet) जातीचा प्राणी पडला असता वनविभाग फलटण तसेच NWWS(Nature And Wildlife Welfare Society,Phaltan) चे सदस्य श्रीनिवास भुजबळ, गणेश अरुण शिंदे, बोधीसगर निकाळजे व शुभम गुप्ते यांनी सुखरूपपणे त्यास विहिरीतून बाहेर काढून त्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

हे कार्य वनपरिक्षेत्र फलटणचे आधिकारी रगतवान तसेच वनपरिमंडळ आधिकारी आवारे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडले.

यावेळी संस्थेच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले की, अशा प्रकारे कोणताही वन्यजीव जखमी व विहिरीत अडकलेल्या अवस्थेमध्ये आढळल्यास संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करावा.

संपर्क – ७५८८५३२०२३,
           ९४२३४९४८६६


Back to top button
Don`t copy text!