
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १६ जुलै २०२४ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीतून माऊलींच्या पालखी सोहळ्यातील जामवंत महाराज यांची दिंडीमधून पायी प्रवास करताना दि. १० जुलै २०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून शेषराव किसनराव बंडले (वय ६७, रा. कोनेगाव, तालुका शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर) हे बेपत्ता झाल्याची खबर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बालाजी किसनराव बंडले (रा. कोनेगाव, तालुका शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर) यांनी दिली आहे.
शेषराव बंडले हे उंची ५.५ इंच, रंग गोरा, फुल बाह्याचा पांढर्या रंगाचा शर्ट, पांढर्या रंगाची पॅन्ट, केस काळे पांढरे, चप्पल, मराठी भाषा बोलतात अशा वर्णनाचे आहेत.
