
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । फलटण । येथील जैन युवा फोरमच्या वतीने दांडीया महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्या गुरूवार दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अनंत मंगल कार्यालय येथे फलटणकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जैन युवा फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका सौ. मधुबाला भोसले, वुमन एम्पपॉवरमेंटच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. निलम लोंढे, प्लॅटिनम लायनेस कल्बच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सुर्यकांत दोशी, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. संगिता दोशी, अरिहंत टिव्हीएसच्या सौ. पुजा दोशी, मॉडर्न किचनच्या सौ. प्रियंका सोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
