जैन सोशल ग्रुप फेडरेशन डे ऊत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण-सामाजीक क्षेञात अग्रेसर असलेल्या जैन सोशल ग्रुप चा स्थापना दिवस फेडरेशन डे फलटण जैन सोशल ग्रुप व संगिनी फोरम फलटण याच्यां संयुक्त विद्यमानाने ऊत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट रिजन कमीटी चेअरमन व फलटण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी व पुजाभाभी दोशी याच्यां हस्ते फेडरेशन ध्वजाचे समारंभपुर्वक ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजा रोहन पुर्वी संगीनि सचिव प्राजक्ता शहा यांनी फेडरेशन सुत्र वाचन केले.

यावेळी बोलताना मंगेश दोशी यांनी जैन सोशल ग्रुप स्थापने बद्दल सवीस्तर माहीती देऊन जास्तीत जास्त नवीन दंपती सदस्य करावेत असे आवाहन केले.

यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डाॅ.सुर्यकांत दोशी,ऊपाध्याक्षां सविता दोशी,JSG ऊपाध्यांक्ष व संगीनी को आॅर्डीनेटर अजितकुमार दोशी,सचिव श्रीपाल जैन,माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी,संचालक डाॅ.मिलिंद दोशी तसेच संगिनि अध्याक्षां संगिता दोशी,सचिव प्राजक्ता शहा ,माजी अध्यांक्षा निना कोठारी ,जैन सोशल ग्रुप व संगीनी फोरमचे बहुसंख्य सदस्य ऊपस्थीत होते. यावेळी संगिनी फोरम मधे आलेल्या नातेपुते येथील नुतन सदस्यांचे गुलाब पुष्प व पिन देऊन स्वागत करण्यात आले. संगिनी सदस्यांनी JSG से हम या धुन वर सुंदर असे समुह नृत्य केले.

जैन सोशल ग्रुपचे सचीव श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविकात जैन सोशल ग्रुप फेडरेशन डे बद्दल माहीती देऊन सर्वाना शुभेच्छा दिल्या. संगीनी सचीव प्राजक्ता शहा यांनी संगीनी फोरमच्या कार्याचा आढावा सादर केला.

सविता दोशी यांची लायन्स प्लॅटीनम च्या अध्यांक्ष पदी निवड होऊन शपथविधी झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने करण्यात आलि.

कार्यक्रमाचे ऊत्कुष्ट असे सुत्रसंचालन सौ. दिप्ती राजवैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन अमिता दोशी यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!