गिरीधर सायन्स अ‍ॅकॅडमीच्या जयदीप कदमला JEE main परीक्षेत घवघवीत यश


दैनिक स्थैर्य | दि. २९ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटणमधील नामांकित गिरिधर सायन्स अ‍ॅकॅडमीच्या जयदीप कदम ह्या विद्यार्थ्याला JEE main परिक्षेमध्ये घवघवीत यश मिळाले.

जयदीप कदम याला JEE main परिक्षेमध्ये ९५.३८ पर्सेंटाईल गुण मिळाले असून त्याचा कॅटॅगिरी रँक ९५ वा आहे.

सातत्यपूर्ण सराव आणि विषयतज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आपणांस हे यश मिळाले, असे जयदीपने आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

आदरणीय शिवराज भोईटे सर आणि मयूर भोईटे सर यांनी 11th & 12th SSC and CBSE board ,JEE / NEET/ MHT-CET परिक्षेचे मार्गदर्शन त्याला केले.

अतिशय माफक फी मध्ये फलटणमधील विद्यार्थ्यांना वरील सर्व परीक्षांचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे पालक वर्गाही समाधानी आहे. तसेच मुलींसाठी अतिशय सुरक्षित वातावरण आणि शिस्त असल्यामुळे पालकांची गिरीधर सायन्स अ‍ॅकॅडमीला जास्त पसंती असलेली दिसून येते.

या यशाबद्दल सर्व पालक, पदाधिकारी आणि शिक्षकांनी जयदीप कदमचे अभिनंदन आणि कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!