
थेट WhatsApp वर मिळवा
लायन्स क्लबचे संस्थापक जगजीवन गरवालिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फलटणमध्ये आयोजित शोकसभेत मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देत आदरांजली वाहिली.
स्थैर्य, फलटण, दि. ०४ ऑक्टोबर : लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी जगजीवन गरवालिया (मिस्त्री) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माळजाई मंदिर येथे भावपूर्ण शोकसभा पार पडली. यावेळी फलटण शहरातील सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या बहुमूल्य कार्याला उजाळा दिला.
कार्याचा गौरव आणि आठवणींना उजाळा
शोकसभेचे प्रास्ताविक मनुभाई पटेल यांनी केले. त्यांनी जगजीवन गरवालिया यांच्या सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, भोजराज नाईक निंबाळकर, मंगेश दोशी, संध्या गायकवाड, जीवन शिंदे आणि प्रा. अरुण इंगळे यांनी आपल्या मनोगतातून गरवालिया यांच्या कार्याचा गौरव केला.
ऋणानुबंधांचे स्मरण आणि श्रद्धांजली
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी ध्वनिमुद्रित संदेशाद्वारे गरवालिया यांच्याशी असलेल्या पन्नास वर्षांच्या ऋणानुबंधांना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेस लायन्स क्लबचे अध्यक्ष रणजित बर्गे, सचिव प्रमोद निंबाळकर, खजिनदार दिलीप शिंदे यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, राजू गरवालिया, महेश गरवालिया, बिल्डर्स असोसिएशनचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरवालिया यांच्या कार्यातून पुढील पिढीला सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





