
थेट WhatsApp वर मिळवा
चौधरवाडी येथे पार पडलेल्या फलटण तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत चौधरवाडी हायस्कूलने प्रथम तर आदर्की हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला.
स्थैर्य, फलटण, दि. ०४ ऑक्टोबर : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या चौधरवाडी हायस्कूल, चौधरवाडी येथे पार पडलेल्या फलटण तालुकास्तरीय १७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत चौधरवाडी हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आदर्कीच्या आदर्की हायस्कूलने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे उद्घाटन आणि उपस्थिती
या क्रीडा स्पर्धेची सुरुवात चौधरवाडीचे सरपंच तुकाराम कोकाटे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून झाली. यावेळी संस्थेचे संचालक अजित गायकवाड, मुख्याध्यापक सूर्यवंशी, फलटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष दशरथ लोखंडे यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांतील क्रीडा शिक्षक आणि खेळाडू विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
विजेत्या खेळाडूंचा सन्मान
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संस्थेच्या संचालिका ऐश्वर्याराजे समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सुरभी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विजयी संघांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर आणि सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक तायप्पा शेंडगे, राजाभाऊ चौधरी, सुखदेव क्षीरसागर आणि माजी विद्यार्थिनी आकांक्षा कांबळे उपस्थित होत्या.





