फलटणच्या ‘निंबकर कृषि संशोधन संस्थे’त प्रकल्प सहाय्यकाची तातडीने भरती; बारावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण येथील सुप्रसिद्ध ‘निंबकर कृषि संशोधन संस्था’ (पशुसंवर्धन विभाग) येथे ‘प्रकल्प सहाय्यक’ (Project Assistant) या पदासाठी कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या होतकरू आणि कष्टाळू तरुण-तरुणींसाठी ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदाचा तपशील आणि आवश्यक पात्रता:

पदाचे नाव: प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)

शैक्षणिक पात्रता: किमान १२ वी उत्तीर्ण (12th Pass) असणे आवश्यक.

कामाचे स्वरूप व अटी: उमेदवार होतकरू आणि चुणचुणीत असावा. संस्थेत कोणतेही काम करण्याची आणि कष्ट घेण्याची उमेदवाराची पूर्ण तयारी असावी.

विशेष प्राधान्य: शेती आणि पशुपालन क्षेत्राची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा अनुभव असलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल.

संपर्क आणि अर्ज तपशील:

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी आपला अर्ज / माहिती खालील ईमेलवर पाठवावी किंवा दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

📧 ईमेल: nimsheep@gmail.com
📞 संपर्क क्रमांक: ७५८८६८५८६७ / ७५५९१९२४५७

04102026

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!