१२ लाखांचे ७१ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत; फलटण ग्रामीण पोलिसांची लक्षवेधी कामगिरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

१२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ७१ हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. परराज्यातून हे मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०४ ऑक्टोबर : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हरवलेले तब्बल १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ७१ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करत पोलिसांनी परराज्यातून हे मोबाईल हस्तगत केले आहेत.

परराज्यातून मोबाईल हस्तगत

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मोबाईल हरवल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत ‘सीईआयआर’ पोर्टलद्वारे शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या पोर्टलवर माहिती अपलोड केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे मोबाईल कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांत वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित वापरकर्त्यांशी संपर्क साधून कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या आणि हे मोबाईल परत मिळवले.

कुरिअरद्वारे आणि प्रत्यक्ष मोबाईल परत

कायदेशीर कारवाईची माहिती दिल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी मोबाईल परत केले. जे नागरिक पोलीस स्टेशनला येऊ शकत नव्हते, त्यांच्याकडून कुरिअरद्वारे मोबाईल मागवण्यात आले, तर काहींकडून प्रत्यक्ष मोबाईल ताब्यात घेण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ, उपनिरीक्षक दीपक पवार, श्रीनाथ कदम, नितीन चतुरे, अमोल जगदाळे आणि हनुमंत दडस यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!